भारूड

आम्ही नवल देखिलें भाई । मुंगीनें हत्तीशीं केली लढाई । उंटाचा कान धरूनि चिमाई । घरोघरीं खात

एकनाथांचे कोडें भारूड.

आम्ही नवल देखिलें भाई । मुंगीनें हत्तीशीं केली लढाई । उंटाचा कान धरूनि चिमाई । घरोघरीं खातसे ॥ १ ॥
सांगा आमुचें कोडें । लांडग्यासाठीं शेळी रडे । कोल्हे हांसतसे बापुडें । उंदीर रेडे खेळती ॥ २ ॥
वरले गांवींचा एक हत्ती । नित्य खातो प्रजापती । सिंह तया येतो काकुळती । हंस रुसे कागाप्रती ॥ ३ ॥
एका जनार्दनाचें कोडें । उगवी तोचि जाणा वेडे । शहाणे त्यासी नुमगे गाढें । अर्थ पहातां चुके लिगाड ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात कोडें या रूपाने सांगतात. आम्ही नवल देखिलें भाई , मुंगीनें हत्तीशीं केली लढाई , उंटाचा कान धरूनि चिमाई , घरोघरीं खातसे. पुढे सांगा आमुचें कोडें , लांडग्यासाठीं शेळी रडे , कोल्हे हांसतसे बापुडें , उंदीर रेडे खेळती. शेवटी एका जनार्दनाचें कोडें , उगवी तोचि जाणा वेडे , शहाणे त्यासी नुमगे गाढें , अर्थ पहातां चुके लिगाड.

- संत एकनाथ