भारूड

सोहं सोहं वाजे ढोल । आमचा युगायुगीचा खेळ

एकनाथांचे कोल्हाटी भारूड.

सोहं सोहं वाजे ढोल । आमचा युगायुगीचा खेळ ।
परब्रह्म भुलले अकळ । या खेळाचे गुरु जाणे मूळ ॥१॥
ब्रह्मा विष्णू शिवादी साचार । आधी होते निराकार ।
माझे कोल्हाटियाचा प्रकार ॥२॥
खेळे परात्पर ऊपरी । चैतन्याचे महाशिखरी ।
वेळु रोविला श्रीसोहंपुरी । खेळ खेळले नानापरी ॥३॥
आमुचा खेळ पाहुन । निर्गुण ते जाहले सगुण ।
शरण एका जनार्दन । गेला तनु मन विसरून ॥४॥

एकनाथ या भारूडात कोल्हाटी या रूपाने सांगतात. सोहं सोहं वाजे ढोल , आमचा युगायुगीचा खेळ , परब्रह्म भुलले अकळ , या खेळाचे गुरु जाणे मूळ. पुढे ब्रह्मा विष्णू शिवादी साचार , आधी होते निराकार , माझे कोल्हाटियाचा प्रकार. शेवटी आमुचा खेळ पाहुन , निर्गुण ते जाहले सगुण , शरण एका जनार्दन , गेला तनु मन विसरून.

- संत एकनाथ