भारूड

आनंदी सद्‍गुरु पूर्ण परात्पर अभेद नमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठ

एकनाथांचे कोल्हाटीण भारूड.

आनंदी सद्गुरु पूर्ण परात्पर अभेद नमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठाव तेणें मज दाखविला ज्ञानांजन घालूनि प्रवृत्ति मार्ग खुंटविला । पूर्ण बोध पाठविला ॥ १ ॥
कोल्हाटीण झाले बाई मी कोल्हाटीण झाले ॥ध्रु०॥
प्रवृत्तीचे वस्त्र फेडुनी सुखा सुखी रिझलें । परात्पर पर पुरुष पाहूनि त्यापाशीं मी गेलें । अंग संगती करून त्याचें सुख म्यां हरविलें । अधरामृत म्या सेविलें । कोल्हाटीण झालें ॥ २ ॥
आशा मनशा तृष्णा ह्या तिन्ही मेळविल्या रांडा । भाव चोहटा वेळू तेथें लावियेला झेंडा । करून उलट प्राणाचा क्रोध तो मारिला मेंढा । ब्रह्मरंध्री मिसळलें आला अमृत लोंढा । मग तो अहंकार मेंगा त्यांनी या भुलविलें सोंगा ॥ को० ॥ ३ ॥
मागें सारून कामें मारिली उफराटी उडी । भ्रांति लुगडें फिटुनि गेलें काया झाली उघडी । पूर्ण अनुभव कळुनी त्यासी मांडिली फुगडी । मदन मोहना दादुला घेउन झाले ते हिजडी ॥को०॥ ४ ॥
परद्वार म्यां केलें जन्मसार्थक झालें । पंचवीस दादुले हातीं धरुनी उठविले । अंतरगृह सावलींत येऊनि निश्चळ बैसलें । एका जनार्दनीं एकी एकपण मुरालें । जन्मजरामरण हरलें ॥को०॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात कोल्हाटीण या रूपाने सांगतात. आनंदी सद्गुरु पूर्ण परात्पर अभेद नमियेला , कायावाचामनें शरण गेलो मी त्याला , मूळचा सर्व ठाव तेणें मज दाखविला ज्ञानांजन घालूनि प्रवृत्ति मार्ग खुंटविला , पूर्ण बोध पाठविला. पुढे कोल्हाटीण झाले बाई मी कोल्हाटीण झाले ० प्रवृत्तीचे वस्त्र फेडुनी सुखा सुखी रिझलें , परात्पर पर पुरुष पाहूनि त्यापाशीं मी गेलें , अंग संगती करून त्याचें सुख म्यां हरविलें , अधरामृत म्या सेविलें , कोल्हाटीण झालें. शेवटी परद्वार म्यां केलें जन.

- संत एकनाथ