भारूड

सगुण गुण माया

एकनाथांचे कोल्हाटीण भारूड.

सगुण गुण माया ।
आली कोल्हाटीण खेळाया ॥ धृ. ॥
प्रपंचाचा रोविला वेळु । चहुं शून्याचा मांडला खेळु ।
ब्रह्माविष्णु जयाचे बाळु । लागती पाया ॥ १ ॥
आला गडे निर्गुण कोल्हाटी । सोहं शब्दे ढोलगे पिटी ।
चैतन्याची उघडून दृष्टी । चला जाऊ पहाया ॥ २ ॥
कोल्हाटीण मारिती ऎशी उडी । एकवीस स्वर्गावरती माडी ।
देखे द्वार खिडकी उघडी । अगाध माया ॥ ३ ॥
कोल्हाटीण बसली असे डोळा । जाणे गुरु पुत्र विरळा ।
एका जनार्दनी लीळा । जाती वर्णाया ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात कोल्हाटीण या रूपाने सांगतात. सगुण गुण माया , आली कोल्हाटीण खेळाया प्रपंचाचा रोविला वेळु , चहुं शून्याचा मांडला खेळु , ब्रह्माविष्णु जयाचे बाळु , लागती पाया. पुढे आला गडे निर्गुण कोल्हाटी , सोहं शब्दे ढोलगे पिटी , चैतन्याची उघडून दृष्टी , चला जाऊ पहाया. शेवटी कोल्हाटीण बसली असे डोळा , जाणे गुरु पुत्र विरळा , एका जनार्दनी लीळा , जाती वर्णाया.

- संत एकनाथ