महारणीच्या बोला । लक्ष द्या सांडोनी गलबला । जागे व्हा सांडोनी झोंपेला । जवळचि उभा काळ आला ॥ १ ॥
जोहार करतें धनी । पायां पडती महारिणी । विसरूं नका धन्याचे स्मरणीं । अंतीं यमाची जाचणी ॥ २ ॥
मी महारीण नोहें लहान । ब्रह्मा विष्णु शिव आदिकरून । माझें म्यांच केलें सगुण । आधीं होतें तें निर्गुण ॥ ३ ॥
माझें मीच जागें करून । केलें सगुणाचें निर्गुण । शरण एका जनार्दन । महारीण सांगे जीवींची खूण ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात महारीण या रूपाने सांगतात. महारणीच्या बोला , लक्ष द्या सांडोनी गलबला , जागे व्हा सांडोनी झोंपेला , जवळचि उभा काळ आला. पुढे जोहार करतें धनी , पायां पडती महारिणी , विसरूं नका धन्याचे स्मरणीं , अंतीं यमाची जाचणी. शेवटी माझें मीच जागें करून , केलें सगुणाचें निर्गुण , शरण एका जनार्दन , महारीण सांगे जीवींची खूण.
- संत एकनाथ