भारूड

पायां पडते महारीण आली

एकनाथांचे महारीण भारूड.

पायां पडते महारीण आली ॥ध्रु०॥
महारीण गेली वरच्या आळी । महारणीनें दिली हारळी । जवळ आली काळाची फेरी ॥ १ ॥
माझें महारणीचें ऐका । जागे असा निजूं नका । काळ करीतसे लेखा गा ॥ २ ॥
एका जनार्दनीं महारीण । करा चंद्रभागें स्नान । घ्यावें पुंडलीक दर्शन । पाहवे विठ्ठलचरण ॥ ३ ॥

एकनाथ या भारूडात महारीण या रूपाने सांगतात. पायां पडते महारीण आली ० महारीण गेली वरच्या आळी , महारणीनें दिली हारळी , जवळ आली काळाची फेरी. पुढे माझें महारणीचें ऐका , जागे असा निजूं नका , काळ करीतसे लेखा गा. शेवटी एका जनार्दनीं महारीण , करा चंद्रभागें स्नान , घ्यावें पुंडलीक दर्शन , पाहवे विठ्ठलचरण.

- संत एकनाथ