भारूड

महाराज ऐका माझी मुखजबानी । तुम्ही कांट्यांत पडला येउनी । बरें होता तये वनीं । हिशेब देणें

एकनाथांचे महारीण भारूड.

महाराज ऐका माझी मुखजबानी । तुम्ही कांट्यांत पडला येउनी । बरें होता तये वनीं । हिशेब देणें लागेल की जी माय सखया ॥ १ ॥
जिवाजी शेट्याचा पळपळाट । बुधाजी कारकून मोठा भाट । शरीरा बाजीचा आटाआट । ऐसा आहे की जी मायसखया ॥ २ ॥
तरी कायापुर अंकितात । परगणें मजकुरास आडवितात । हिशेब देणें लागेल की जी मायसखया ॥ ३ ॥
तुम्ही म्हणाल ही महारीण । या प्रसंगीं कुळ अगत्यारीण । जिवाजी पाटलाची प्राण-मैत्रीण । लोभ मजवर फार आहे की जी मायसखया ॥ ४ ॥
आतां मी सांगतें तें करा । केली कमाई नेऊं नका घरा । एकांतीं नेऊन पाय धरा । विठुरायाचे की जी मायसखया ॥ ५ ॥
विठुरायाचा दूत । त्याचे फार अंकितात । आहे की जी मायसखया ॥ ६ ॥
तरी आतां व्हावें सावधान । विठ्ठलासी जावे शरण । गुरुकृपेचे ध्यान धरून । जिवलग पाहेन की जी मायसखया ॥ ७ ॥
राघवासी शरण जातां । यमाजीपंताचे न चले तत्त्वतां । एकाजनार्दनीं विनविता । मुख जबानी की जी मायसखया ॥ ८ ॥

एकनाथ या भारूडात महारीण या रूपाने सांगतात. महाराज ऐका माझी मुखजबानी , तुम्ही कांट्यांत पडला येउनी , बरें होता तये वनीं , हिशेब देणें लागेल की जी माय सखया. पुढे जिवाजी शेट्याचा पळपळाट , बुधाजी कारकून मोठा भाट , शरीरा बाजीचा आटाआट , ऐसा आहे की जी मायसखया. शेवटी राघवासी शरण जातां , यमाजीपंताचे न चले तत्त्वतां , एकाजनार्दनीं विनविता , मुख जबानी की जी मायसखया.

- संत एकनाथ