भारूड

वारी वो वारी । देई का गा मल्हारी

एकनाथांचे मल्हारी भारूड.

वारी वो वारी । देई का गा मल्हारी ।
त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ।
वाहन तुझे घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी ।
वाघ्या मुरळी नाचती परोपरी । आवडी ऎसी पाहील जेजुरी ।
ज्ञान कोटंबा घेऊन आलो दारी । बोध भंडारा लावीन परोपरी ।
एका जनार्दनी विनवी श्रीहरी । वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ।

एकनाथ या भारूडात मल्हारी या रूपाने सांगतात. वारी वो वारी , देई का गा मल्हारी , त्रिपुरारी हरी , तुझे वारीचा मी भिकारी , वाहन तुझे घोड्यावरी , वरी बैसली म्हाळसा सुंदरी , वाघ्या मुरळी नाचती परोपरी , आवडी ऎसी पाहील जेजुरी , ज्ञान कोटंबा घेऊन आलो दारी , बोध भंडारा लावीन परोपरी , एका जनार्दनी विनवी श्रीहरी , वारी देऊनी प्रसन्न मल्हारी.

- संत एकनाथ