भारूड

आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई

एकनाथांचे मानभाव भारूड.

आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई ॥ध्रु॥
मुळीचाची मानभाव वस्त्रे काळी केली ।
कोरके मागुन झॊळी भरली । उलटी काठी धरली ॥१॥
सोन्यारुप्याचे देव आम्ही मोडूनियां खाऊं ।
शेंद्राचे देव आम्ही दृष्टी ना पाहू ॥२॥
एका जनार्दनी मानभाव झाला ।
झॊळीवरती झॊळी ठेवूनी गडबड गुंडा केला ॥३॥

एकनाथ या भारूडात मानभाव या रूपाने सांगतात. आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई मुळीचाची मानभाव वस्त्रे काळी केली , कोरके मागुन झॊळी भरली , उलटी काठी धरली. पुढे सोन्यारुप्याचे देव आम्ही मोडूनियां खाऊं , शेंद्राचे देव आम्ही दृष्टी ना पाहू. शेवटी एका जनार्दनी मानभाव झाला , झॊळीवरती झॊळी ठेवूनी गडबड गुंडा केला.

- संत एकनाथ