हयात मायबाप हयात । गांव असतां वस पडले ।
घर असता जळून गेले । जोडे असता टेकां मोडले ।
ते माझ्या जाळीत सापडले । हयात मायबाप हयात ॥ १ ॥
गांवचे पाटील मरून गेले । त्याचे नारीने चुडे भरले ।
त्याचे वाड्याचे बुरुज ढासळले । ते पोर चोरीत सापडले ।
हयात मायबाप हयात ॥ २ ॥
एका जनार्दनी मांग । पाटील आपुले नारीला सांग ।
सांगितले तर काम । नाहीतर उरफाट्या झाडासी टांग ।
हयात मायबाप हयात ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात मांग या रूपाने सांगतात. हयात मायबाप हयात , गांव असतां वस पडले , घर असता जळून गेले , जोडे असता टेकां मोडले , ते माझ्या जाळीत सापडले , हयात मायबाप हयात. पुढे गांवचे पाटील मरून गेले , त्याचे नारीने चुडे भरले , त्याचे वाड्याचे बुरुज ढासळले , ते पोर चोरीत सापडले , हयात मायबाप हयात. शेवटी एका जनार्दनी मांग , पाटील आपुले नारीला सांग , सांगितले तर काम , नाहीतर उरफाट्या झाडासी टांग , हयात मायबाप हयात.
- संत एकनाथ