मुका झालो वाचा गेली ॥ध्रु॥
होतो पंडीत महाज्ञानी । दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी ।
चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानि ॥१॥
जिव्हा लाचविली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।
निदिले उपान्ना । तेणे पातलो मुखबन्धना ॥२॥
साधू संतांची निन्दा केली । हरिभक्तांची स्तुति नाही केली ।
तेणे वाचा पंगू झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥३॥
एकनाथ या भारूडात मुका या रूपाने सांगतात. मुका झालो वाचा गेली होतो पंडीत महाज्ञानी , दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी , चारी वेद मुखोद्गत वाणी , गर्वामध्ये झाली सर्व हानि. पुढे जिव्हा लाचविली भोजना , दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना , निदिले उपान्ना , तेणे पातलो मुखबन्धना. शेवटी साधू संतांची निन्दा केली , हरिभक्तांची स्तुति नाही केली , तेणे वाचा पंगू झाली , एका जनार्दनी कृपा लाधली.
- संत एकनाथ