भारूड

एक नवल देखिलें । एका चोरानें गांव चोरिलें । त्याचे मागें धांवणें निघालें । चोर आणि गांव ना

एकनाथांचे नवल भारूड.

एक नवल देखिलें । एका चोरानें गांव चोरिलें । त्याचे मागें धांवणें निघालें । चोर आणि गांव नाहींसे झालें ॥ १ ॥
मुळींच गांवा नव्हता पाया । वरला गांवकुस गेला वायां । खादून गेला मुळींचा पाया । उडाले देउळ देव गेला वांया ॥ २ ॥
कळस उडाला स्वर्गावरी । पाया गेला पाताळविवरीं । भिंत हिंडे दारोदारीं । ऐशी जहाली नवलपरी ॥ ३ ॥
देऊळ पाया आणि भिंती । अर्थ पहा उगवोनि गुंती । एका जनार्दनीं विश्रांती । देव देऊळ अवघा गुरुमूर्ती ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात नवल या रूपाने सांगतात. एक नवल देखिलें , एका चोरानें गांव चोरिलें , त्याचे मागें धांवणें निघालें , चोर आणि गांव नाहींसे झालें. पुढे मुळींच गांवा नव्हता पाया , वरला गांवकुस गेला वायां , खादून गेला मुळींचा पाया , उडाले देउळ देव गेला वांया. शेवटी देऊळ पाया आणि भिंती , अर्थ पहा उगवोनि गुंती , एका जनार्दनीं विश्रांती , देव देऊळ अवघा गुरुमूर्ती.

- संत एकनाथ