मूळ नाहीं शेंडा । काय म्हणावें त्या गुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शास्त्रें भांडती खंड विखंडा ॥ १ ॥
नवल जहालें बाई । पाणियानें विस्तव पेटला कोणा सांगावें काई ॥ध्रु०॥
शून्य होतें आधीं तेथें जाहलें एक । एक पाहतां दोन जहाले अलक्ष लक्ष देख ॥ २ ॥
पुरुष नाहीं स्त्री नाहीं नाहीं कांहीं आकार । पहातां पाहाणें बुडोनि गेले तेथें कैंचा निराकार ॥ ३ ॥
ब्रह्मज्ञान घरोघरीं कोण तया पुसे । शरण एका जनार्दनीं नाम गातसे ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात नवल या रूपाने सांगतात. मूळ नाहीं शेंडा , काय म्हणावें त्या गुंडा , वेद अनुवादती प्रचंडा , शास्त्रें भांडती खंड विखंडा. पुढे नवल जहालें बाई , पाणियानें विस्तव पेटला कोणा सांगावें काई ० शून्य होतें आधीं तेथें जाहलें एक , एक पाहतां दोन जहाले अलक्ष लक्ष देख. शेवटी ब्रह्मज्ञान घरोघरीं कोण तया पुसे , शरण एका जनार्दनीं नाम गातसे.
- संत एकनाथ