भारूड

आता झाले नवलाई । पुन्हा जन्मा येणे नाही

एकनाथांचे नवलाई भारूड.

आता झाले नवलाई । पुन्हा जन्मा येणे नाही ॥
बोधाचे कुंकू कपाळी लाविले । भक्ताकाठी हाती धरिले ।
ज्ञानाचा कुरकुला घेतला काखेत । प्रेमाचा खुळकुळा अनुहत वाजे ॥
एका जनार्दनी नवलाई झाला । संतापायी खेळावया आला ॥

एकनाथ या भारूडात नवलाई या रूपाने सांगतात. आता झाले नवलाई , पुन्हा जन्मा येणे नाही बोधाचे कुंकू कपाळी लाविले , भक्ताकाठी हाती धरिले , ज्ञानाचा कुरकुला घेतला काखेत , प्रेमाचा खुळकुळा अनुहत वाजे एका जनार्दनी नवलाई झाला , संतापायी खेळावया आला.

- संत एकनाथ