शूर धीर स्वामीपणें । पाईक पेणें शोभे त्या ॥ १ ॥
नेणेंचि कधीं दुजा ठाव । एक भाव स्वामी काजीं ॥ २ ॥
जाईल तरी जावो प्राण । परि स्वामीस नये उणेपण ॥ ३ ॥
एका जनार्दनीं उदार । मिरविती बडिवार पाइकीचा ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात पाईक या रूपाने सांगतात. शूर धीर स्वामीपणें , पाईक पेणें शोभे त्या. पुढे नेणेंचि कधीं दुजा ठाव , एक भाव स्वामी काजीं. शेवटी एका जनार्दनीं उदार , मिरविती बडिवार पाइकीचा.
- संत एकनाथ