भारूड

याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळी पाईक

एकनाथांचे पाईक भारूड.

याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळी पाईक ॥ १ ॥
उदार धीर एक मनें । स्वामीकार्या देह देणें ॥ २ ॥
न धरिती कांहीं आशा । म्हणोनि सर्वेशा पात्र होती ॥ ३ ॥
एका जनार्दनीं पाईक । मुकुटमणी स्वामिया एक ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात पाईक या रूपाने सांगतात. याची सत्ता स्वामीवरी , ऐसे ते बळी पाईक. पुढे उदार धीर एक मनें , स्वामीकार्या देह देणें. शेवटी एका जनार्दनीं पाईक , मुकुटमणी स्वामिया एक.

- संत एकनाथ