भारूड

जो जो जो जो रे रघुनामा । निज बाळा गुणधामा । योगी आलासे विश्रामा । स्वामी दावीन तुम्ही

एकनाथांचे पाळणा भारूड.

जो जो जो जो रे रघुनामा । निज बाळा गुणधामा । योगी आलासे विश्रामा । स्वामी दावीन तुम्ही ॥ध्रु०॥
जोगी दिसतसे विचित्र । त्याला तीन नेत्र । चर्मावेगळें नाहीं वस्त्र । म्हणवितो तुझा मित्र ॥ १ ॥
अंगीं लावुनियां विभुती । अर्धांगी पार्वती । वृषभारूढ तो पशुपती । त्रिशुळ डमरू हातीं ॥ २ ॥
आणिक नवल दयाळा । कंठ दिसे निळा । मस्तकीं गंगा वाहे झुळझूळा । नेत्री अग्निज्वाळा ॥ ३ ॥
भस्म चर्चुनी सर्वांगीं । वेष्टिला भुजंगीं । भूतें मेळवूनियां बहु जगीं । आलासे प्रसंगीं ॥ ४ ॥
जोगी आलासे अंगणीं । तुळशी वृंदावनीं । तुजला देखूनियां नयनीं । घाली लोटांगणीं ॥ ५ ॥
गोकुळीं जन्मलें निधान । जगदीश तो जाण । त्याचे चरणीं शरण । एका जनार्दन ॥ ६ ॥

एकनाथ या भारूडात पाळणा या रूपाने सांगतात. जो जो जो जो रे रघुनामा , निज बाळा गुणधामा , योगी आलासे विश्रामा , स्वामी दावीन तुम्ही ० जोगी दिसतसे विचित्र , त्याला तीन नेत्र , चर्मावेगळें नाहीं वस्त्र , म्हणवितो तुझा मित्र. पुढे अंगीं लावुनियां विभुती , अर्धांगी पार्वती , वृषभारूढ तो पशुपती , त्रिशुळ डमरू हातीं. शेवटी गोकुळीं जन्मलें निधान , जगदीश तो जाण , त्याचे चरणीं शरण , एका जनार्दन.

- संत एकनाथ