माझें पत्र धन्याला । वैकुंठवासी नांदतो त्याला । असा धनी माझा भला । माझ्या पूर्वजांचा उद्धार केला ॥ १ ॥
भक्त संकटीं रक्षिला । मजवर फार उपकार केला । तडीतापडी धांवून आला । पत्राचा मजकूर त्यानें पाहिला ॥ २ ॥
संकट पाहूनि भला बोध केला । चार खाणी नऊ दरवाजे । दश इंद्रियें हाच बोध केला ॥ ३ ॥
भुक्ति मुक्ति शक्ति मजपाशीं ठेविल्या । ऐसे चार वेद वर्णी । एका जनार्दन वाणी ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात पत्र या रूपाने सांगतात. माझें पत्र धन्याला , वैकुंठवासी नांदतो त्याला , असा धनी माझा भला , माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. पुढे भक्त संकटीं रक्षिला , मजवर फार उपकार केला , तडीतापडी धांवून आला , पत्राचा मजकूर त्यानें पाहिला. शेवटी भुक्ति मुक्ति शक्ति मजपाशीं ठेविल्या , ऐसे चार वेद वर्णी , एका जनार्दन वाणी.
- संत एकनाथ