पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ॥ १ ॥
डुग डुग ऐका डुग डुग ऐका ॥ध्रु०॥
पिंगळा बैसोनि कळसावरी । तेथोनि गर्जतो नानापरी । बोल बोलति अति कुसरी । सावध ऐका ॥ २ ॥
किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल । तुलमिल तुलमिल । तुलबिल तुलबिल ॥ ३ ॥
तुमचें गांवींचा एक ठाणेदार । गांवच्या पाटलाची एक थोरली नार । तिसी रतला तो करा विचार । एका जनार्दनीं बोले सारासार विचार ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात पिंगळा या रूपाने सांगतात. पिंगळा महाद्वारीं , बोली बोलतो देखा , शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका. पुढे डुग डुग ऐका डुग डुग ऐका ० पिंगळा बैसोनि कळसावरी , तेथोनि गर्जतो नानापरी , बोल बोलति अति कुसरी , सावध ऐका. शेवटी तुमचें गांवींचा एक ठाणेदार , गांवच्या पाटलाची एक थोरली नार , तिसी रतला तो करा विचार , एका जनार्दनीं बोले सारासार विचार.
- संत एकनाथ