भारूड

वरल्या आळींच्यांनो दादा सावध ऐका । गांव हा पांचांचा यासी भुलुं नका । पिंगळा बोलतो बोला । त

एकनाथांचे पिंगळा भारूड.

वरल्या आळींच्यांनो दादा सावध ऐका । गांव हा पांचांचा यासी भुलुं नका । पिंगळा बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला ॥ १ ॥
डुग डुग डुग दादा डुग डुग डुग दादा ॥ध्रु०॥
चिलबिल चिलबिल । बोली बोलतो बोल । अर्थ पहातां दिसे सखोल । ब्रह्माविष्णुमहेश भुलले सकळ ॥ २ ॥
चिल्यापिल्याच्या भारा । हाचि सांडा पसारा । गुंतले याची हावा धरुनी विचारा । तुलमिल तुलमिल करती नारी आणि नर ॥ ३ ॥
विचक्षण तोचि जाणे येथील अर्थ । येरां न कळे आपआपुला स्वार्थ । शरण एका जनार्दनीं न सांडी हा पंथ । तुटेल खुंटलें अवघें जाहलें एक येथ ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात पिंगळा या रूपाने सांगतात. वरल्या आळींच्यांनो दादा सावध ऐका , गांव हा पांचांचा यासी भुलुं नका , पिंगळा बोलतो बोला , तुम्ही सांडा गलबला. पुढे डुग डुग डुग दादा डुग डुग डुग दादा ० चिलबिल चिलबिल , बोली बोलतो बोल , अर्थ पहातां दिसे सखोल , ब्रह्माविष्णुमहेश भुलले सकळ. शेवटी विचक्षण तोचि जाणे येथील अर्थ , येरां न कळे आपआपुला स्वार्थ , शरण एका जनार्दनीं न सांडी हा पंथ , तुटेल खुंटलें अवघें जाहलें एक येथ.

- संत एकनाथ