राम राम म्हणूनी सदा रडे ।
जे जे देखे त्याच्या पाया पडे ॥१॥
देव देखत पिसे पाही ।
आपले पारखे नोळखे काही ॥२॥
बोलामाजि घाली मौनाची मिठी ।
शून्याही वरील सांगतो गोष्टी ॥३॥
आपुलिया माथां आपण मारी ।
त्याच्या पिसेपणा कोण आवरी ॥४॥
एका जनार्दनी पिसा झाला खरा ।
आपुल्या आपण ताशी शरीरा ॥५॥
एकनाथ या भारूडात पिसा या रूपाने सांगतात. राम राम म्हणूनी सदा रडे , जे जे देखे त्याच्या पाया पडे. पुढे देव देखत पिसे पाही , आपले पारखे नोळखे काही. शेवटी एका जनार्दनी पिसा झाला खरा , आपुल्या आपण ताशी शरीरा.
- संत एकनाथ