भारूड

ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या

एकनाथांचे पोर भारूड.

ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या ।
बोलणे अवघे वोखट्या । हित नाही ॥१॥
आपुले हित तू पाही । वेदशास्त्री काही नाही ।
पुराणे पढोनि केले काही । हित नाही ॥२॥
कामक्रोधे शरीर भरले । ज्ञान वैराग्य हारपले ।
बोलसी विषयाच्या बोले । हित नाही ॥३॥
आपुले हित करी काही । सद्गुरुसी शरण जाई ।
'मी-तू' पणा नुरे काही । हित पाही ॥४॥
एका जनार्दनी पोर । केला सारासार विचार ।
पावला सद्गुरद्वार । हित जाले ॥५॥

एकनाथ या भारूडात पोर या रूपाने सांगतात. ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या , वलवल करू नको पोरट्या , बोलणे अवघे वोखट्या , हित नाही. पुढे आपुले हित तू पाही , वेदशास्त्री काही नाही , पुराणे पढोनि केले काही , हित नाही. शेवटी एका जनार्दनी पोर , केला सारासार विचार , पावला सद्गुरद्वार , हित जाले.

- संत एकनाथ