भारूड

हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझा जुना

एकनाथांचे रहाट भारूड.

हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझा जुना ॥ध्रु०॥
दारची गोधन कां तोडना । मजल रहाट करून कां द्याना । माझे रहाटाकडे कां पहाना ॥ १ ॥
तुमचा बैल कां माराना । मजला तात करून कां द्याना । माझे तातांकडे कां पाहना ॥ २ ॥
तुमची तलवार कां मोडाना । मजला चात करून कां द्याना । माझ्या चाताकडे कां पहाना ॥ ३ ॥
तुमचा टाळ कां मोडाना । मजला भिंगरी करून कां द्याना । माझ्या भिंगरीकडे कां पहाना ॥ ४ ॥
तुमचीं वस्त्रें कां फाडाना । मजला पिंजून कां द्याना । माझ्या पिंजण्याकडे कां पहाना ॥ ५ ॥
पिंजून पिंजून केला पिळू । नव इंद्रियां खेळू । एका जनार्दनीं पिळू ॥ ६ ॥

एकनाथ या भारूडात रहाट या रूपाने सांगतात. हुंडगी निघाली बाजारा , बारिक माझा जुना ० दारची गोधन कां तोडना , मजल रहाट करून कां द्याना , माझे रहाटाकडे कां पहाना. पुढे तुमचा बैल कां माराना , मजला तात करून कां द्याना , माझे तातांकडे कां पाहना. शेवटी पिंजून पिंजून केला पिळू , नव इंद्रियां खेळू , एका जनार्दनीं पिळू.

- संत एकनाथ