भारूड

संसार नगरी बाजार भरला भाई

एकनाथांचे संसार बाजार भारूड.

संसार नगरी बाजार भरला भाई ।
कामक्रोध लोभ याचे गिर्हाइक पाही ॥ १ ॥
यात सुख नाही त्यात सुख नाही ।
या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥
या हाटासी थोर थोर मेले ।
नारद शुक भीष्म उमगले ॥ ३ ॥
आणिक संती बाजार पाहिला ।
व्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥ ४ ॥
या बाजारी सुख नाही भाई ।
माझे माझे म्हणॊ वोझे वाही ॥ ५ ॥
एका जनार्दनी बाजार लटिका ।
संतसंगावाचुनी नोहे सुटिका ॥ ६ ॥

एकनाथ या भारूडात संसार बाजार या रूपाने सांगतात. संसार नगरी बाजार भरला भाई , कामक्रोध लोभ याचे गिर्हाइक पाही. पुढे यात सुख नाही त्यात सुख नाही , या हाटाचे सुख कोठे नाही. शेवटी एका जनार्दनी बाजार लटिका , संतसंगावाचुनी नोहे सुटिका.

- संत एकनाथ