वासुकी सर्प मोठा दारूण । क्रोधे बैसला बिळी जाऊन।
सहज मी तेथे केले गमन । तमोगुण घेलले सारवण ।
तेथून नष्ट आला धावून । त्याने मजवरी झडप घेतली जाण ॥ १ ॥
साप चावला । अगागागा । अबाबाबा ।
अताताता । अररेरे साप चावला ॥ धृ. ॥
याची जात मोठी कठीण । माया भुलली पडला येऊन ।
माझे जडावले मन । गरगर गिरकी आली दारूण ।
साप चावला ॥ २ ॥
या गिरकीचे नाही भय । मी सहस्त्र केले अन्याय ।
तोचि दडपला हा पाय । आता कोण वाचवील ठाव ।
साप चावला ॥ ३ ॥
माझा देवावर हवाला । प्राण जावो परता गेला ।
एका जनार्दनी म्हणे भला । आजिचा शेवट गोड झाला ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात सर्प या रूपाने सांगतात. वासुकी सर्प मोठा दारूण , क्रोधे बैसला बिळी जाऊन, सहज मी तेथे केले गमन , तमोगुण घेलले सारवण , तेथून नष्ट आला धावून , त्याने मजवरी झडप घेतली जाण. पुढे साप चावला , अगागागा , अबाबाबा , अताताता , अररेरे साप चावला याची जात मोठी कठीण , माया भुलली पडला येऊन , माझे जडावले मन , गरगर गिरकी आली दारूण , साप चावला. शेवटी माझा देवावर हवाला , प्राण जावो परता गेला , एका जनार्दनी म्हणे भला , आजिचा शेवट गोड झाला.
- संत एकनाथ