सहा दादुले केले परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । काया वाचा रमलें त्याशीं परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ १ ॥
सौरी झालें सौरी सखेबाई झालें त्याची नवरी ॥ध्रु०॥
नग्न होउनि भोगिला पुरुष म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । देतो गोड गोड खाया परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ २ ॥
केला संसार गोड परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । याचे मनाची पुरविली खोड परि म्यां ऐसा नाही देखिला दादुला ॥ ३ ॥
ऐसी सौरी झालें परि म्यां नाहीं देखिला दादुला । एका जनार्दनीं नमिलें पायीं ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात सौरी या रूपाने सांगतात. सहा दादुले केले परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला , काया वाचा रमलें त्याशीं परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला. पुढे सौरी झालें सौरी सखेबाई झालें त्याची नवरी ० नग्न होउनि भोगिला पुरुष म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला , देतो गोड गोड खाया परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला. शेवटी ऐसी सौरी झालें परि म्यां नाहीं देखिला दादुला , एका जनार्दनीं नमिलें पायीं ऐसा नाहीं देखिला दादुला.
- संत एकनाथ