न करी वो चाळा स्वैरीचिया बोला । वेधला जीव निसंगपणें खाती नवा गोळा ॥ १ ॥
ऐसे नव्हे भले कोणा मानवले । जग जगीं हांसती मोडिताती डोळे ॥ २ ॥
फुकटचि संग स्वैरीयेचा बरा । दिवाण दारीं फजिती थोरी वहातसे वारा ॥ ३ ॥
पडलें मोकळें ढुंगण आतां कैसा संग । मागें पुढें फजिती झाली अठरा झाले दंग ॥ ४ ॥
एका जनार्दनीं स्वैरी झाली संतपाय धरा । नाहीं तरी उभ्या बाजारीं फजितीचा थारा ॥ ५ ॥
एकनाथ या भारूडात सौरी या रूपाने सांगतात. न करी वो चाळा स्वैरीचिया बोला , वेधला जीव निसंगपणें खाती नवा गोळा. पुढे ऐसे नव्हे भले कोणा मानवले , जग जगीं हांसती मोडिताती डोळे. शेवटी एका जनार्दनीं स्वैरी झाली संतपाय धरा , नाहीं तरी उभ्या बाजारीं फजितीचा थारा.
- संत एकनाथ