भोळा दादुला बाई म्यां केला । संसार सारा नागविला ॥ १ ॥
सौरी होऊन गेलें सुख नाहीं झालें । पुनरपि संसारी मी हो आलें ॥ २ ॥
चार पांच साहा अठरांसी रतलें । त्यांचे संग मन चावट हो झालें ॥ ३ ॥
एकाएकीं संतसंग झाला । एका जनार्दनीं संसार तुटला ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात सौरी या रूपाने सांगतात. भोळा दादुला बाई म्यां केला , संसार सारा नागविला. पुढे सौरी होऊन गेलें सुख नाहीं झालें , पुनरपि संसारी मी हो आलें. शेवटी एकाएकीं संतसंग झाला , एका जनार्दनीं संसार तुटला.
- संत एकनाथ