मी सुखाची कन्यका झाले वाढविली घरी ।
देखता पाहता उचलून उचलून नेली चोरी ॥ १ ॥
सौरी झाले बाई आता करू तरी काई ॥ धृ. ॥
निसुगाचा पुत्र झाला जावा नणंदा घरी ॥
पाहतां देखतां उचलून उचलून नेली चोरी ॥ २ ॥
बारा सोळा मुले झाली आले सुना नातू ।
कंबरेवरी हातू ॥ ३ ।
कैची बहीण कैची माय अंतकाळी देखा ।
निदानीचे वेळी तुज देव मारी हाका ॥ ४ ॥
लेकुरवाळी बाईल म्हणे तोंड यांचे झाका ।
एका जनार्दनी म्हणे भवीं भुलू नका ॥ ५ ॥
एकनाथ या भारूडात सौरी या रूपाने सांगतात. मी सुखाची कन्यका झाले वाढविली घरी , देखता पाहता उचलून उचलून नेली चोरी. पुढे सौरी झाले बाई आता करू तरी काई निसुगाचा पुत्र झाला जावा नणंदा घरी पाहतां देखतां उचलून उचलून नेली चोरी. शेवटी लेकुरवाळी बाईल म्हणे तोंड यांचे झाका , एका जनार्दनी म्हणे भवीं भुलू नका.
- संत एकनाथ