भारूड

हाट करूनि घरासी आणली बैसली वसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागे पाठी रे

एकनाथांचे शंखीण डंखीण भारूड.

हाट करूनि घरासी आणली बैसली वसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागे पाठी रे ॥ १ ॥
शंखीण बाबा डंखीण । त्या घरी शंखीण बाबा डंखीण रे ॥ध्रु०॥
चौ शेरांचा वरणभात केला वर भाजीचा गोळा रे । मोठे मोठे घास घेती भुरळ फिरवी डोळा रे ॥ २ ॥
आठ भाकरी बारा पोळ्यां धिरडी खादली सोळा रे । पाणी पिउनी ढेकर दिला मराठी तिचा मोळा रे ॥ ३ ॥
बारा सोळा लुगडीं नेसली येइना पाठिपोटीं रे । नव खणांची चोळी शिवली उराशीं येईना गाठीं रे ॥ ४ ॥
एका जनार्दनीं म्हणे बाबा ऐशी बाइल केली रे । तिच्या भयानें सर्व पळूनियां गेली रे ॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात शंखीण डंखीण या रूपाने सांगतात. हाट करूनि घरासी आणली बैसली वसरीच्या काठी रे , घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागे पाठी रे. पुढे शंखीण बाबा डंखीण , त्या घरी शंखीण बाबा डंखीण रे ० चौ शेरांचा वरणभात केला वर भाजीचा गोळा रे , मोठे मोठे घास घेती भुरळ फिरवी डोळा रे. शेवटी एका जनार्दनीं म्हणे बाबा ऐशी बाइल केली रे , तिच्या भयानें सर्व पळूनियां गेली रे.

- संत एकनाथ