भारूड

सत्त्व गांठीं उमगा । तेणें सफळ होईल शिमगा । तुम्ही हेंच गाणें गा । तुम्ही हसूं नका

एकनाथांचे शिमगा भारूड.

सत्त्व गांठीं उमगा । तेणें सफळ होईल शिमगा । तुम्ही हेंच गाणें गा । तुम्ही हसूं नका ॥ १ ॥
भूत सभेची कारटीं । विषय गोवर्या चोरटी । उतरी कुकर्माची राहाटी । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ २ ॥
जागोजागीं थांबा । अवघ्या मिळोनी मारा बोंबा । न जळे एरंडाच्या कोंबा । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ३ ॥
गांवचा पाटील कोळी । काळोबाची पिकली पोळी । तुमची पाजाळूं द्या होळी । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ४ ॥
ओटींत घेउनी गुलाल । सख्या मेहुणीसंगें भुलाल । तिचा नवरा मोठा जलाल । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥५ ॥
एका जनार्दनीं पोस्त । गाणें गातां हालमस्त । नाहीं तर भडवे समस्त । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ६ ॥

एकनाथ या भारूडात शिमगा या रूपाने सांगतात. सत्त्व गांठीं उमगा , तेणें सफळ होईल शिमगा , तुम्ही हेंच गाणें गा , तुम्ही हसूं नका. पुढे भूत सभेची कारटीं , विषय गोवर्या चोरटी , उतरी कुकर्माची राहाटी , तुम्ही हसूं नका हसूं नका. शेवटी एका जनार्दनीं पोस्त , गाणें गातां हालमस्त , नाहीं तर भडवे समस्त , तुम्ही हसूं नका हसूं नका.

- संत एकनाथ