बैसोनी स्वप्न सांगे लोका । नवल आजी पाहिलें तृषा लागली उदका ।
अग्नि जो खादाड न मिळे तया इंधन देखा । पनवु पालाणीं बांधिला देखा ॥ १ ॥
स्वप्नाचें नवल जागृती ऐका । जागृती स्वप्न दोन्ही मिथ्या जाहले देखा ॥ ध्रु० ॥
पंचभूतांची मिळणी जाहली परस्परीं । विसरुनी द्वैतभावा समरसले एकसरीं ।
कर्दमीं रुतलें नवल विंदान परोपरी । काय सांगू या स्वप्नाची नसे आज दुरी
॥ २ ॥
एक नारी एक पुरुष उभयतां देखिले । विवाहमंडप चौबारा घातलें ।
सोहळा औट प्रकार न दिसोनी देखिलें । वर्तन करूं सांगू जातां जागृत मी जाहलें ॥ ३ ॥
ऐसें स्वप्न देखिलें जनार्दन दृष्टि । मिथ्यामय सर्व भासलें उघडली सृष्टी ।
एका जनार्दनीं पायीं पडली मिठी । अहंता ममता यांची सुटलीसे गांठी ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात स्वप्न या रूपाने सांगतात. बैसोनी स्वप्न सांगे लोका , नवल आजी पाहिलें तृषा लागली उदका , अग्नि जो खादाड न मिळे तया इंधन देखा , पनवु पालाणीं बांधिला देखा. पुढे स्वप्नाचें नवल जागृती ऐका , जागृती स्वप्न दोन्ही मिथ्या जाहले देखा ० पंचभूतांची मिळणी जाहली परस्परीं , विसरुनी द्वैतभावा समरसले एकसरीं , कर्दमीं रुतलें नवल विंदान परोपरी , काय सांगू या स्वप्नाची नसे आज दुरी. शेवटी ऐसें स्वप्न देखिलें जनार्दन दृष्टि , मिथ्यामय सर्व भासलें उघडली सृष्टी.
- संत एकनाथ