भारूड

माझा टिळा माझा टिळा । धाक पडे कळिकाळा । चौघांचा करूनि गुंडाळा । शेष पाताळी घातला कीं

एकनाथांचे टिळा भारूड.

माझा टिळा माझा टिळा । धाक पडे कळिकाळा । चौघांचा करूनि गुंडाळा । शेष पाताळी घातला कीं ॥ १ ॥
टिळ्यानें दाविलें कैलास । केला गंधर्वाचा नाश । धाक दरारा इंद्रचंद्रास । सुख लागलें तेव्हां ध्रुवास ॥ २ ॥
हा टिळा कोणाचा जाणे हा टिळा शुद्ध चैतन्य नीतीनें । महत विष्णु म्हणती जाणें । हा टिळा रेखिला यानें ॥ ३ ॥
माझ्या टिळ्यापासून । आकाश पाताळ कैलास । तत्पर असेल त्यांत कोण । सुंदर सगुण निरूपण ॥ ४ ॥
हा टिळा शोधून जातां । न ये ब्रह्मादिकांच्या हाता । त्याला नाहीं मातापिता । मग कैंचा काका चुलता ॥ ५ ॥
ह्या टिळ्याची ऐका खूण । विरंची करी ध्यान । ज्यापासून झाला उत्पन्न । केलें वेदाचें खंडण । चारी मुक्ती साधिल्या त्यानें ॥ ६ ॥
टिळ्या तुला नाहीं हात ना पाय । टिळा स्वरूपी राहे । एका जनार्दनीं ध्याये । माझा टिळा ॥ ७ ॥

एकनाथ या भारूडात टिळा या रूपाने सांगतात. माझा टिळा माझा टिळा , धाक पडे कळिकाळा , चौघांचा करूनि गुंडाळा , शेष पाताळी घातला कीं. पुढे टिळ्यानें दाविलें कैलास , केला गंधर्वाचा नाश , धाक दरारा इंद्रचंद्रास , सुख लागलें तेव्हां ध्रुवास. शेवटी टिळ्या तुला नाहीं हात ना पाय , टिळा स्वरूपी राहे , एका जनार्दनीं ध्याये , माझा टिळा.

- संत एकनाथ