भारूड

कर जोडोनि विनवितो तुम्हां । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा

एकनाथांचे वासुदेव भारूड.

कर जोडोनि विनवितो तुम्हां । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ।
नको गुंतू विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१॥
नरदेह दुर्लभ जाणा । शतवर्षांची गणना ।
त्यामध्ये दु:ख यातना । तुम्ही आठवा मधुसूदना ॥२॥
नलगे तीर्थांचे भ्रमण । नलगे दंडण मुंडण ।
नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदना ॥३॥
हेचि माझी विनवणी । जोडितो कर दोन्ही ।
शरण एका जनार्दनी । तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी ॥४॥

एकनाथ या भारूडात वासुदेव या रूपाने सांगतात. कर जोडोनि विनवितो तुम्हां , तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा , नको गुंतू विषयकामा , तुम्ही आठवा मधुसूदना. पुढे नरदेह दुर्लभ जाणा , शतवर्षांची गणना , त्यामध्ये दु:ख यातना , तुम्ही आठवा मधुसूदना. शेवटी हेचि माझी विनवणी , जोडितो कर दोन्ही , शरण एका जनार्दनी , तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी.

- संत एकनाथ