भारूड

धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे

एकनाथांचे वासुदेव भारूड.

धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे ।
रामकृष्ण वासुदेव सदास्मरा वाचे ॥१॥
सुखदु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ ।
ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ ॥२॥
विषयी विरक्त जया नाही आपपर
संतुष्ट सर्वदा स्वयें व्यापक निर्धार ॥३॥
जाणीव शहाणीव वोझे सांडूनिया दूरी ।
आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥
एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।
आसनी शयनी सदा हरीचे चिंतन ॥५॥

एकनाथ या भारूडात वासुदेव या रूपाने सांगतात. धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे , रामकृष्ण वासुदेव सदास्मरा वाचे. पुढे सुखदु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ , ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ. शेवटी एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन , आसनी शयनी सदा हरीचे चिंतन.

- संत एकनाथ