भारूड

विषय सेविता गा जन्ममरणाचा बंधु

एकनाथांचे वासुदेव भारूड.

विषय सेविता गा जन्ममरणाचा बंधु ।
विवेक गुरु वाक्य छेदीभव बंधु ॥१॥
रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गळती गा ।
रामकृष्ण वासुदेव हरि देही विदेही जाला गा ॥२॥
गुरुवाक्य भावबळे निजबोधे पै बुद्धि ।
तेणे बोधे पाहता गा अखंड समाधी ॥३॥
जनी वनी निरंजनी वासुदेव समान ।
एका जनार्दनी चित्त चैतन्य घन ॥४॥

एकनाथ या भारूडात वासुदेव या रूपाने सांगतात. विषय सेविता गा जन्ममरणाचा बंधु , विवेक गुरु वाक्य छेदीभव बंधु. पुढे रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गळती गा , रामकृष्ण वासुदेव हरि देही विदेही जाला गा. शेवटी जनी वनी निरंजनी वासुदेव समान , एका जनार्दनी चित्त चैतन्य घन.

- संत एकनाथ