भारूड

सुखे सेऊं ब्रह्मानंदा । गाऊ रामनाम सदा

एकनाथांचे वासुदेव भारूड.

सुखे सेऊं ब्रह्मानंदा । गाऊ रामनाम सदा ।
नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥
करू वासुदेव स्मरण । तेणे तुटे रे बंधन ।
खंडेल कर्माचे वदन । वासुदेव जपतांची ॥२॥
तीर्थायात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊं ।
संतासंगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥३॥
लोभ ममता सोडू आशा । उदारव्यथेचा बोळसा ।
न करूं आणिक सायासा । वासुदेवावाचुनी ॥४॥
मुख्य वर्माचे हे वर्म । येणे साधे सकळ धर्म ।
एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥

एकनाथ या भारूडात वासुदेव या रूपाने सांगतात. सुखे सेऊं ब्रह्मानंदा , गाऊ रामनाम सदा , नोहे मग बाधा , काळदूत यमाची. पुढे करू वासुदेव स्मरण , तेणे तुटे रे बंधन , खंडेल कर्माचे वदन , वासुदेव जपतांची. शेवटी मुख्य वर्माचे हे वर्म , येणे साधे सकळ धर्म , एका जनार्दनी नाम , वासुदेव आवडी.

- संत एकनाथ