पूर्वी पंक्तिस केला भेद । नाही अंत:करण शुद्ध
झाले वटवाघूळ प्रसिद्ध ॥ १ ॥
वटवाघूळझाले बाई । करावे काई । उपाय नाही ॥ धृ. ॥
वटवाघळीचा जन्म घेऊन । घेतले उफराटे टांगून ।
तोंडी नरक भरला जाण ॥ २ ॥
वटवाघळीची यातना मोठी । भोगिल्या चौर्यांशी कोटी ।
जन्ममरणाच्या तुटल्या गाठी ॥ ३ ॥
एकाजनार्दनी वटवाघूळ झाले । सद्गुरुला शरण गेले ।
जन्ममरण चुकविले ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात वटवाघूळ या रूपाने सांगतात. पूर्वी पंक्तिस केला भेद , नाही अंत:करण शुद्ध झाले वटवाघूळ प्रसिद्ध. पुढे वटवाघूळझाले बाई , करावे काई , उपाय नाही वटवाघळीचा जन्म घेऊन , घेतले उफराटे टांगून , तोंडी नरक भरला जाण. शेवटी एकाजनार्दनी वटवाघूळ झाले , सद्गुरुला शरण गेले , जन्ममरण चुकविले.
- संत एकनाथ