भारूड

अधरी धरूनि वेणु

एकनाथांचे वेणु भारूड.

अधरी धरूनि वेणु ।
वेणु वाजविला कोणी नेणु ॥ १ ॥
प्रात:काळी तो वनमाळी ।
घेऊन जातो धेनु ॥ २ ॥
उभी मी राहे वाट मी पाहे ।
केव्हां भेटेल मम कान्हु ॥ ३ ॥
एका जनार्दनी वाजविला वेणु ।
ऎकता मन झाले तल्लिन्नु ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात वेणु या रूपाने सांगतात. अधरी धरूनि वेणु , वेणु वाजविला कोणी नेणु. पुढे प्रात:काळी तो वनमाळी , घेऊन जातो धेनु. शेवटी एका जनार्दनी वाजविला वेणु , ऎकता मन झाले तल्लिन्नु.

- संत एकनाथ