पाळणा बांधीला , रंगीत सुंदर । तान्हा सुकुमार माउलीचा ॥
पालख पाळणा , मोत्यांनी विणीला ।
मामानें धाडीला, तान्हे बाळा ॥
रंगीन पाळणा, त्याला रेशमाची दोरी ।
हालवीते गोरी, इंदूताई ॥
पाळण्याचे दोर , जसे मोतियाचे सर ।
शोभिवंत घर, पाळण्याने ॥
आंथरुण केले , पांघरुण शेला । निजवीले तुज , मधुबाळा ॥
आंथरुण केले , मऊ उबदार । झोप चारी प्रहर, तान्हे बाळा ॥
सकळच्या वेळी, किती असे कामधंदा । नको रडू तू गोविंदा, तान्हे बाळा ॥
पहांटेची वेळ, नीज रे बाळपणी । ऊठ तू मोठेपणी , तान्हे बाळा ॥
नीज रे बाळाका , आपुल्या पालखी । तुला रक्षण जानकी - रघुनाथ ॥
या पाळण्यात सांगितले आहे. पाळणा बांधीला , रंगीत सुंदर , तान्हा सुकुमार माउलीचा पालख पाळणा , मोत्यांनी विणीला , मामानें धाडीला, तान्हे बाळा रंगीन पाळणा, त्याला रेशमाची दोरी , हालवीते गोरी, इंदूताई पाळण्याचे दोर , जसे मोतियाचे सर , शोभिवंत घर, पाळण्याने आंथरुण केले , पांघरुण शेला , निजवीले तुज , मधुबाळा आंथरुण केले , मऊ उबदार , झोप चारी प्रहर, तान्हे बाळा सकळच्या वेळी, किती असे कामधंदा , नको रडू तू गोविंदा, तान्हे बाळा पहांटेची वेळ, नीज रे ब.
- पारंपरिक