गाणी

गुणी बाळ असा जागसि कां रे

पारंपरिक मराठी पाळणा.

गुणी बाळ असा जागसि कां रे वांया । नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई । तरि डोळा लागत नाहीं ॥
हा चालतसे चाळा एकच असला । तिळ उसंत नाहीं जिवाला ॥
निजवायाचा हरला सर्व उपाय । जागाच तरी शिवराय ॥
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
कां कष्‍टविसी तुझी सांवळी काया । नीज रे नीज शिवराया ॥१॥
ही शांत निजे बारा मावळ थेट । शिवनेरी जुन्नर पेठ ॥
त्या निजल्या ना तशाच घाटाखालीं । कोंकणच्या चवदा ताली ॥
ये भिववाया बागुल तो बघ बाळा । किति बाई काळा काळा ॥
इकडे हे सिद्दि-जवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलुख मैदान
हे आले रे तुजला बाळ धराया । नीज रे नीज शिवराया ॥२॥

या पाळण्यात सांगितले आहे. गुणी बाळ असा जागसि कां रे वांया , नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई , तरि डोळा लागत नाहीं हा चालतसे चाळा एकच असला , तिळ उसंत नाहीं जिवाला निजवायाचा हरला सर्व उपाय , जागाच तरी शिवराय चालेल जागता चटका हा असाच घटका घटका कुरवाळा किंवा हटका कां कष्‍टविसी तुझी सांवळी काया , नीज रे नीज शिवराया. ही शांत निजे बारा मावळ थेट , शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखालीं , कोंकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल.

- पारंपरिक