गाणी

जो जो जो :जो रे कुळभुषणा

पाळणा.

जो जो जो:जो रे कुळभुषणा । दशरथनंदना ॥
निद्रा करिं बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥ध्रु०॥
पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशीं ॥
पुत्र जन्मला हृषिकेशी । कौसल्येचे कुशीं ॥१॥
रत्‍नजडित पालख । झळके अमोलिक ॥
वरती पहुडले कुळदीपक । त्रिभुवननायक ॥२॥
हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ॥
पुष्पें वर्षीलीं सुरवरीं । गर्जती जयजयकारी ॥३॥
विश्वव्यापका रघुराया । निद्रा करि बा सखया ॥
तुजवर कुरवंडी करुनियां । सांडिन अपुली काया ॥४॥
येउनि वसिष्‍ठ सत्वर । सांगे जन्मांतर ॥
राम परब्रह्म साचार । सातवा अवतार ॥५॥
याग रक्षुनियां अवधारा । मारुनि रजनीचरां ॥
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥
पर्णिल जानकी सुरुपा । भंगुनियां शिवचापा ॥
रावण लज्जित महाकोपा । नव्हे पण हा सोपा ॥७॥
सिंधूजलडोहीं अवलीळा । नामें तरतिल शिळा ॥
त्यांवरि उतरुनियां दयाळा । नेशी वानरमेळा ॥८॥
समूळ मर्दुनि रावण । स्थापिल बिभीषण ॥
देव सोडविले संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥
राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ॥
दास विठ्ठलें ऐकिला । पाळणा गाईला ॥१०॥

या पाळण्यात सांगितले आहे. : रे कुळभुषणा , दशरथनंदना निद्रा करिं बाळा मनमोहना , रामा लक्षुमणा ध्रु० पाळणा लांबविला अयोध्येसी , दशरथाचे वंशीं पुत्र जन्मला हृषिकेशी , कौसल्येचे कुशीं. पुढे रत्‍नजडित पालख , झळके अमोलिक वरती पहुडले कुळदीपक , त्रिभुवननायक. शेवटी राम भावाचा भुकेला , भक्ताधीन झाला दास विठ्ठलें ऐकिला , पाळणा गाईला.

- दास विठ्ठल