गाणी

बाळा जो जो रे कुळभूषणा ।

पारंपरिक मराठी पाळणा.

बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ॥
निद्रा करिं बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥बाळा॥धृ०॥
जन्मुनि मथुरेंत यदुकुळीं । आलासी वनमाळी ॥
पाळणा लांबविला गोकुळीं । धन्य केले गौळी ॥बाळा जो०॥
बंदीशाळेंत अवतरुनी । द्वारें मोकलुनी ॥
जनकशृखंला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥बाळा जो०॥
मार्गीं नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ॥
शेष धांवला तत्क्षणा । उंचावूनी फणा ॥बाळा जो०॥
रत्‍नजडित पालख । झळके अमोलिक ॥
वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥बाळा जो०॥
हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ॥
पुष्पें वर्षींलीं सुरवरीं । गर्जति जयजयकारीं ॥बाळा जो०॥
विश्वव्यापका यदुराया । निद्रा करिं बा सखया ॥
तुजवरी कुरवंडी करुनियां । सांडिन मी निज काया ॥बाळा॥
गर्ग येऊनि सत्वर । सांगे जन्मांतर ॥
कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार॥बाळा जो०॥
विश्वव्यापी हा बाळक । दुष्‍ट दैत्यांतक ॥
प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥बाळा जो०॥
वीष पाजाया पूतना । येतां घेईल प्राणा ॥
शकटासुरसी उताणा । पाडिल लाथें जाणा ॥बाळा जो०॥
उखळा बांधतां मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ॥
यमलार्जुनाचें उद्धरण । दावानळप्राशन॥बाळा जो०॥
गोधन राखितां अवलीळा । काळीया मर्दीला ॥
दावानळ वन्ही प्राशीला । दैत्यध्वंस केला ॥बाळा जो०॥
इंद्र कोपतां धांवून । उपटी गोवर्धन ॥
गाई गोपाळां रक्षून । केलें वनभोजन ॥बाळा जो०॥
कालिंदीतीरीं जगदीश । व्रजवनितांशीं रास ॥
खेळुनि मारील कंसास । मुष्‍टिक भूमीवर ॥
पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदीं स्थिर ॥बाळा जो०॥

या पाळण्यात सांगितले आहे. बाळा रे कुळभूषणा , श्रीनंदनंदना निद्रा करिं बाळा मनमोहना , परमानंदा कृष्णा बाळा ० जन्मुनि मथुरेंत यदुकुळीं , आलासी वनमाळी पाळणा लांबविला गोकुळीं , धन्य केले गौळी बाळा बंदीशाळेंत अवतरुनी , द्वारें मोकलुनी जनकशृखंला तोडुनी , यमुना दुभंगोनी बाळा मार्गीं नेतांना श्रीकृष्णा , मेघनिवारणा शेष धांवला तत्क्षणा , उंचावूनी फणा बाळा रत्‍नजडित पालख , झळके अमोलिक वरती पहुडले कुलतिलक , वैकुंठनायक बाळा हालवी यशोदा सुंदरी , धरुनी.

- पारंपरिक