जो जो जो जो रे मुनिवर्या । स्वामी दत्तात्रया ॥
सांगुनि पूर्वीचा निजपर्या । हालविती अनुसूया ॥धृ॥
असतां निजसदनीं अत्रिमुनी । मागितलें मज पाणी ।
मुसळ थांबविलें तेचि क्षणीं । ऐकुनि मुनिची वाणी ॥१॥
नारद मुनिनें तें पाहुनि । सांगितलें सुरसदनीं ।
हरि - हर - ब्रह्मांच्या त्रैपत्नी । क्षोभविल्या अभिमानी ॥२॥
त्यांनीं आपुलाले दाटुले । छळणासी धाडिले ।
त्यांहीं अडवुनिया मज वहिले । भिक्षेसी भागितले ॥३॥
मग म्यां तीर्थातें शिंपिले । तिन्ही बाळे केले ।
भोजन घालुनिया निजवीले । संवत्सर बहु गेल ॥४॥
उमा सावित्री लक्षूमी । आल्या आमुच्या धामीं ।
त्यांनीं मागितले निजस्वामी । सांडुनि आपुली मी मी ॥५॥
मग म्यां दाखविले देवत्रय । तो तूं दत्तात्रय ।
निरंजनासि आश्रय । सखया तुझा होय ॥६॥ जो जो ॥
या पाळण्यात सांगितले आहे. रे मुनिवर्या , स्वामी दत्तात्रया सांगुनि पूर्वीचा निजपर्या , हालविती अनुसूया असतां निजसदनीं अत्रिमुनी , मागितलें मज पाणी , मुसळ थांबविलें तेचि क्षणीं , ऐकुनि मुनिची वाणी. पुढे नारद मुनिनें तें पाहुनि , सांगितलें सुरसदनीं , हरि - हर - ब्रह्मांच्या त्रैपत्नी , क्षोभविल्या अभिमानी. शेवटी मग म्यां दाखविले देवत्रय , तो तूं दत्तात्रय , निरंजनासि आश्रय , सखया तुझा होय.
- पारंपरिक