तुज जोजविते माय जिजाई बाळा । नीज रे नीज लडिवाळा ।
मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला ॥
झोके देते गीत गात अंगाई । तरी डोळा लागत नाही ।
बाळा असला थांबिव चाळा आता । थकले मी झोके देता ॥
तू महाराष्ट्राचा त्राता । मनी धरली कसली चिंता ।
पाठिशी भवानी माता । माउलिया जीवीचा जिव्हाळा ।
नीज रे नीज लडिवाळा ॥१॥
चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी बाळा खुशाल ।
झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ॥
नि:शब्द कशी पसरली रे शांती । या मराठी भूमीवरती ॥
बागूलबुवा आला काळा काळा । झडकरी झोप रे बाळा ॥
कोकणच्या चौदा ताली । झोपल्या घाटाखाली ।
आणि रात्र बहुतचि झाली । किती सांगु तुला समजावू वेल्हाळा ।
नीज रे नीज लडिवाळा ॥२॥
या पाळण्यात सांगितले आहे. तुज जविते माय जिजाई बाळा , नीज रे नीज लडिवाळा , मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला , झोप का येईना तुजला झोके देते गीत गात अंगाई , तरी डोळा लागत नाही , बाळा असला थांबिव चाळा आता , थकले मी झोके देता तू महाराष्ट्राचा त्राता , मनी धरली कसली चिंता , पाठिशी भवानी माता , माउलिया जीवीचा जिव्हाळा , नीज रे नीज लडिवाळा. चल ठेव दुरी हातामधली ढाल , निद्रा करी बाळा खुशाल , झोपली कशी बारा मावळी थेट , शिवनेर जुन्नर पेठ नि:शब्द कशी पस.
- पारंपरिक