जो जो जो जो रे घनशाश्या । निजबाळा गुणधामा ।
जोगी आलासे निश्रामा । स्वामी दाविन तुम्हां ॥ जो जो ॥धृ॥
जोगी दिसतो विचित्र । त्याल तीन नेत्र ।
चर्मावेगळे नसे वस्त्र । म्हणवी तुझ्या मित्र ॥ जो जो ॥१॥
आंगी लावुनियां विभूती । अर्धांगी पार्वती ।
वृषभारुढ तो पशुपती । त्रिशुळ डमरु हाती ॥ जो जो ॥२॥
आणिक एक नवल दयाळा । कंठ दिसतो निळा ।
मस्तकी जळ वाहे झुळझुळा । नेत्री अन्निज्वाळा ॥ जो जो ॥३॥
योगी आलासे अंगणी । तुळसीवृदांवनी ।
तुजला देखीले नयनी । घालीत लोटांगणी ॥ जो जो ॥४॥
आळ घेतली न राहे । जोगी दावी माये ।
सर्पभूषणी तो आहे । परब्रह्म पाहे ॥ जो जो ॥५॥
गोकुळीं जन्मले निधान । परब्रह्मा ते जाण ।
तयाचे चरणी शरण । एकाजनार्दन । जो जो ॥६॥
या पाळण्यात सांगितले आहे. रे घनशाश्या , निजबाळा गुणधामा , गी आलासे निश्रामा , स्वामी दाविन तुम्हां गी दिसतो विचित्र , त्याल तीन नेत्र , चर्मावेगळे नसे वस्त्र , म्हणवी तुझ्या मित्र. पुढे आंगी लावुनियां विभूती , अर्धांगी पार्वती , वृषभारुढ तो पशुपती , त्रिशुळ डमरु हाती. शेवटी गोकुळीं जन्मले निधान , परब्रह्मा ते जाण , तयाचे चरणी शरण , एकाजनार्दन.
- पारंपरिक