गाणी

जो भक्तजन करुणाकर क्षीरसि

नामदेवांचा पाळणा.

जो भक्तजन करुणाकर क्षीरसिंधुचा दानी । तो चोरोनी खाये लोणी नवल देखा ॥१॥
जो न माये भूतळीं वेदार्थाहिन कळे । तो बांधिला उखळे नवल देखा ॥२॥
एका पादें करुनी आक्रमी मेदिनी । त्यासी चालूं सिकविती गवळणी नवल देखा ॥३॥
ज्याचे मायेचेनी कुवाडे ब्रम्हादिकां वेडे । तो बागुल म्हणतां दडे नवल देखा ॥४॥
दानवांची कोटी हेळांचि निवटी । त्यातें माता भयें दावी सीपटी नवल देखा ॥५॥
नामा म्हणे हरी विश्वीं विश्वंभरी । तो म्हणती नंदाघरीं नवल देखा ॥६॥

या पाळण्यात सांगितले आहे. भक्तजन करुणाकर क्षीरसिंधुचा दानी , तो चोरोनी खाये लोणी नवल देखा. पुढे न माये भूतळीं वेदार्थाहिन कळे , तो बांधिला उखळे नवल देखा. शेवटी नामा म्हणे हरी विश्वीं विश्वंभरी , तो म्हणती नंदाघरीं नवल देखा.

- संत नामदेव