जो जो जो जो रे सुखधामा । भक्तपूर्ण कामा ॥ध्रु०॥
क्षत्रिय संहारी रणांगणीं । उग्र स्वभाव करणी ।
भारी श्रमलासी खेळणीं । उद्धरितां हे धरणी ॥
धेनु द्विजांचे पाळणा । करितां अवतारंणा ।
तुजला निजवितां पाळणा । दीनावरि करिं करुणा ॥जो०॥
देव अवतरले हृषिकेशी । भृगूऋषीच्या वंशीं ।
संगें घेउनियां विधि-हरिसी । रेणुकेचे कुशीं ॥
सागर सारुनियां बसवीले । कोंकण जन-पाळिले ।
दुष्टाचरणातें दवडीलें । यश हें प्रसिद्ध केलें ॥जो०॥
स्वस्थानीं जावें भार्गवा । अखंडित चिरंजीवा ।
योगमाया ते करि सेवा । परशुराम देवा ॥
हालवी रेणुका पाळणा । गाई त्या सगुणा ।
सखया रामाच्या आभरणा । चुकवीं जन्ममरणा ॥जो०॥
या पाळण्यात सांगितले आहे. रे सुखधामा , भक्तपूर्ण कामा ध्रु० क्षत्रिय संहारी रणांगणीं , उग्र स्वभाव करणी , भारी श्रमलासी खेळणीं , उद्धरितां हे धरणी धेनु द्विजांचे पाळणा , करितां अवतारंणा , तुजला निजवितां पाळणा , दीनावरि करिं करुणा देव अवतरले हृषिकेशी , भृगूऋषीच्या वंशीं , संगें घेउनियां विधि-हरिसी , रेणुकेचे कुशीं सागर सारुनियां बसवीले , कोंकण जन-पाळिले , दुष्टाचरणातें दवडीलें , यश हें प्रसिद्ध केलें स्वस्थानीं जावें भार्गवा , अखंडित चिरंज.
- पारंपरिक