गाणी

जो जो जो जो रे सुकुमारा ।

पारंपरिक मराठी पाळणा.

जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रय अवतारा ॥ध्रु०॥
कमलासन विष्णु त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरीं ॥
सत्‍व हरुं आले नवलपरी । भ्रम दवडीला दुरी ॥जो०॥
प्रसन्न त्रिमूर्ति होऊनि । पुत्रत्वा पावुनी ।
हर्ष झालासे त्रिभुवनीं । राहे ऋषिचे सदनीं ॥जो०॥
पालख बांधविला सायासीं । निर्गुण ऋषिचे वंशीं ।
पुत्र जन्मला अविनाशी । अनसूयेचे कुशीं ॥जो०॥
षट्‌दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।
कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥जो०॥

या पाळण्यात सांगितले आहे. रे सुकुमारा , दत्तात्रय अवतारा ध्रु० कमलासन विष्णु त्रिपुरारी , अत्रिमुनीचे घरीं सत्‍व हरुं आले नवलपरी , भ्रम दवडीला दुरी प्रसन्न त्रिमूर्ति होऊनि , पुत्रत्वा पावुनी , हर्ष झालासे त्रिभुवनीं , राहे ऋषिचे सदनीं पालख बांधविला सायासीं , निर्गुण ऋषिचे वंशीं , पुत्र जन्मला अविनाशी , अनसूयेचे कुशीं षट्‌दश नामासी आधार , दत्तात्रय अवतार , कृष्णदासासी सुख थोर , आनंद होतो फार.

- पारंपरिक