गाणी

जो जो जो जो रे व्यापका ।

पारंपरिक मराठी पाळणा.

जो जो जो जो रे व्यापका । सृष्‍टीच्या पालका ।
निज निज निज बा तूं बालका । तान्हुल्या सात्त्विका ॥ध्रु०॥
धांवसि दासाच्या धांवणिया । म्हणवुनि श्रमली काया ॥
श्रम सांडुनियां निज ध्येया । हालवितें पाळणिया ॥जो०१॥
शीतें व्यापिलें तुज भारी । निजतां सागरजठरीं ॥
आला काळीमा शरीरीं । फणिवर धुधुःकारीं ॥जो जो०२॥
अद्‌भुत तव महिमा श्रुतिनिगमा । नकळे तुझी सीमा ।
तो तूं स्‍त्रीकामा घनश्यामा । अंतरी धरुनी कामा ॥जो जो०३॥
तुजला कैसी बा लाज नसे । कैसें झालें पिसें ।
त्र्यंबक प्रभु विनवी तुज बहुसें । येत असे रे हांसें ॥जो०४॥

या पाळण्यात सांगितले आहे. रे व्यापका , सृष्‍टीच्या पालका , निज निज निज बा तूं बालका , तान्हुल्या सात्त्विका ध्रु० धांवसि दासाच्या धांवणिया , म्हणवुनि श्रमली काया श्रम सांडुनियां निज ध्येया , हालवितें पाळणिया १ शीतें व्यापिलें तुज भारी , निजतां सागरजठरीं आला काळीमा शरीरीं , फणिवर धुधुःकारीं २ अद्‌भुत तव महिमा श्रुतिनिगमा , नकळे तुझी सीमा , तो तूं स्‍त्रीकामा घनश्यामा , अंतरी धरुनी कामा ३ तुजला कैसी बा लाज नसे , कैसें झालें पिसें , त्र्यंबक.

- पारंपरिक